Friday, May 20, 2022

मोठी बातमी:संभाजी छत्रपतींनी दिले पक्ष स्थापन करण्याचे संकेत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संभाजी छत्रपती यांची राज्यसभा सदस्यत्वाची टर्म आज संपली. त्यामुळे संभाजी छत्रपती हे आता राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली.

काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे संभाजी छत्रपती यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, संभाजीराजे यांनीच

या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. 6 मे नंतर पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी स स्वतंत्र पक्ष काढायचा की अजून काही वेगळा निर्णय घ्यायचा हे ठरवू. त्याच दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट करू, असं

संभाजी छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती हे नवा राजकीय पक्ष काढण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधला. गेल्या सहा वर्षात

खासदार म्हणून मी काम केलं. उद्या खासदार असलो नसलो तरी माझे काम चालूच ठेवणार आहे. 3 मेच्या नंतर मी माझी भूमिका जाहीर करेल असं म्हटले होते. आता 6 मे नंतर मी माझी भूमिका आणि पुढील वाटचाल

स्पष्ट करणार आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक इशारा दिलेला आहे. या फोटो मध्ये संभाजीराजे हे

छत्रपती शाहू महाराजांवरील पुस्तक वाचताना दिसत असून मागे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या तसबीरी आहेत. तसेच शाहूपुत्र छत्रपती राजाराम

महाराज, संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमा या फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटो सोबत संभाजीराजे

यांनी “आजन्म विचारांशी बांधील” असेही म्हटले आहे. निश्चितच संभाजीराजे यांना ते आपल्या या पूर्वजांच्या विचारांशी बांधील आहेत, हेच म्हणायचे आहे.काही दिवसांपूर्वी

माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी आपली पुढची राजकीय दिशा 3 मे रोजी माझी टर्म संपल्यानंतर जाहीर करेन, असे सांगितले होते. आज संभाजीराजे यांनी हा फोटो ट्विट करीत एक सूचक

कल्पना दिली आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कालच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेस मध्ये यावेत अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे हे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे.

ताज्या बातम्या

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...
error: Content is protected !!