Tuesday, May 17, 2022

नगर ब्रेकिंग:तुझा नवरा तुला नांदवीत नाही, तू माझ्याकडे रहा. मी तुला सांभाळतो असे म्हणून विवाहित तरुणीचा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुझा नवरा तुला नांदवीत नाही, तू माझ्याकडे रहा. मी तुला सांभाळतो. असे म्हणून विवाहित तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

ही घटना राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथे घडली आहे.राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात एक 26 वर्षीय विवाहित तरूणी तिच्या सासरच्या नातेवाईकांसह राहत आहे. दि. 29 एप्रिल

रोजी साडे अकरा वाजे दरम्यान आरोपी लतिफ गुलाब शेख हा त्या विवाहित तरूणीला म्हणाला, तुझा नवरा तुला नांदवीत नाही. तू माझ्याकडे घरी रहा. मी तुला सांभाळतो. असे म्हणून त्याने विवाहित तरुणीच्या

अंगाला नको त्या ठिकाणी हात लावून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. विवाहित तरूणीने विरोध केला असता लतिफ शेख म्हणाला, तू कोणाला काहीएक सांगू नको.

तू जर कोणाला काही सांगितले तर तुला घरातच जिवंत गाडून टाकीन. अशी धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.घटनेनंतर त्या विवाहित तरूणीने घडलेला प्रकार तिच्या माहेरच्या लोकांना सांगितला.

त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद नोंदवली. विवाहित तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी लतिफ गुलाब शेख, राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी.

याच्या विरोधात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंतराव आव्हाड करीत आहेत.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!