Friday, May 20, 2022

या महिन्यात कांदा शेतकऱ्यांना हसवणार; दर 50 ते 60 रुपये किलोवर जाण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत.

आता या स्पर्धेत भाजीपाला देखील मागे राहिला नाही. भाजीपाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत. आता यात भर म्हणजे जुलैमध्ये कांदा महागणार असल्याची बातमी समोर येत आहे.

जुलैमध्ये कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याने

आता व्यापारी देखील मागे नसून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांद खेरेदी करत आहेत. कांद्यांची अचानक मागणी वाढल्याने पुढील एक -दोन महिन्यात कांद्याच्या दरात मोठी भाव वाढ पहायला मिळू शकते असा अंदाज आहे.

मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. कोसळलेल्या कांद्याच्या दराचा फायदा घेऊन नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ‘नाफेडने’ मोठा प्रमाणात कांदा

खरेदीला सुरुवात केली आहे. नाफेड प्रमाणेच व्यापारी देखील सध्या स्वस्तात मिळणारा कांदा खरेदी करत आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी विक्री सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने कांद्याचे दर स्वस्त आहेत. मात्र आता नाफेड आणि व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीचा सपाटा लावल्याने लवकरच कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर पोहोचू शकतात असा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!