Wednesday, May 25, 2022

कृषिमंत्र्यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा सल्ला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या रब्बी हंगाम संपला असून आता खरिपाचे वेध लागले आहे. शेतकऱ्यांपूर्वी प्रशासनालाच योग्य त्या प्रकारची तयारी ही करावीच लागते. सध्या जिल्हा स्तरावरील

बैठकात बी-बियाणे, खत आणि यंत्रणा याचा आढावा घेतला जात असला तरी कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. शेतकरी एखादा पाऊस झाला की, चाढ्यावर मूठ

ठेवण्याच्या तयारीत असतो. मात्र, पुन्हा पावासाने ओढ दिली तरी दुबार पेरणी ही ठरलेलीच आहे. याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असतो. त्यामुळे किमान 100 मिमि पाऊस झाल्याशिवाय

शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेऊच नये. शिवाय पेरणीपूर्वी कृषी अधिकाऱ्यांचा एक सल्ला देखील उत्पादन वाढीसाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळे बी-बियाणे आणि खताची चिंता न करता उत्पादनवाढ करण्याचे

आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. तर दुसरीकडे खरीप पेरणीपूर्व पीक कर्जाचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.52 लाख टन खताची मागणी 45 लाख मेट्रीक टनाला मंजूरी

यंदा रासायनिक खताचा तुटवडा भासेल अशी अफवा पसरवली जात आहे. जेणेकरुन खताचे दर वाढून मध्यंस्तींना त्याचा फायदा होईल. पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

खरिपासाठी राज्याने केंद्राकडे 52 लाख मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. 45 लाख मेट्रिक टन आवनटन केंद्राने मंजूर केले आहे. दर महिन्याला त्यात्या वेळे प्रमाणे, खत मे जून जुलै या तीन महिन्यात

उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही राज्याच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत, बी-बियाणांचा तुटवडा भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.दरवर्षी खरीप

हंगामात बी-बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक असे प्रकार हे घडतातच. यंदा खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या किंमतीमध्ये खत विकण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली आहे.

मात्र, बियाणे खते बाबत शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर दुकानदारसह ज्यांनी खत बनविली त्या कम्पनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री यांनी दिले आहेत.

खरीप हंगामासाठीचे पीककर्ज वितरणास सुरवात झाली आहे. एप्रिल महिन्यांपासून कृषी योजना राबवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर यंत्रणा अद्यापही हललेली नाही.

खरीप हंगामासाठीचे पीक कर्ज वितरणास सुरवात झाली आहे. या कर्जावर खरिपाचा खर्च निघेल .शिवाय शेतकऱ्यांना ऐन गरजेच्या वेळी ही रक्कम पदरी पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या

ठेवी ज्याप्रमाणे ठेऊन घेतल्या जातात त्याच प्रमाणे कर्जाचेही वितरण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!