Tuesday, May 24, 2022

Facebook ची मोठी घोषणा, 31 मेपासून बंद होणार हे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: फेसबुक लवकरच काही फीचर्स बंद करणार आहे. फेसबुकचं नियरबाय फ्रेंड्स फीचर 31 मे पासून उपलब्ध होणार आहे. या फीचरद्वारे लोकांना फेसबुक युजर्ससह

आपलं सध्याचं लोकेशन शेअर करता येत होतं. कंपनीने युजर्सला नियरबाय फ्रेंड्स फीचर आणि इतर लोकेशन बेस्ड फीचर्स बंद होण्याबाबत सूचित केलं आहे.Nearby Friends

या फीचरसह फेसबुक वेदर अलर्ट , लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राउंड लोकेशनही बंद करणार आहे.ट्विटरवर अनेक युजर पोस्टनुसार, फेसबुकने Facebook App वर एका नोटिफिकेशनच्या

माध्यमातून फ्रेंड्स नियरबाय फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. युजर्सला पाठवण्यात आलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये कंपनीने सांगितलं, की या फीचरद्वारे कोणते फ्रेंड्स तुमच्या जवळपास आहेत, हे सांगणारं नियरबाय फीचर 31 मे 2022 पासून उपलब्ध होणार नाही.

वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री, बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शनदेखील फेसबुकवरुन हटवण्यात येणार आहेत. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी 1

ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर ते हटवलं जाईल. परंतु फेसबुकने असंही स्पष्ट केलं, की ते इतर अनुभवांसाठी युजर्सच्या लोकेशनची माहिती मिळवणं चालूच ठेवेल.फेसबुकने 2014 मध्ये

iOS आणि अँड्रॉइड दोन्हीसाठी नियरबाय फ्रेंड्स फीचर रोल आउट करण्यास सुरूवात केली होती. या फीचरमुळे कोणता मित्र तुमच्या जवळपास आहे याची माहिती मिळते. एकदा नियरबाय फ्रेंड्स ऑन

केल्यानंतर तुमचे फ्रेंड्स आजूबाजूला असल्यास सूचित केलं जातं, जेणेकरुन तुम्ही त्यांना संपर्क करू शकाल किंवा भेटू शकाल. परंतु आता हे लोकेशन बेस्ड फीचर बंद होणार आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!