Tuesday, May 24, 2022

संतापजनक:नगरमध्ये विवाहिता घरातील किचनमध्ये एकटीच बघून दिराने किचनमध्ये येऊन…..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नगरमध्ये महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यामुळे नगर शहरातील

महिला मध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.विवाहितेचा दिराने विनयभंग केला. घडलेला प्रकार पतीला

सांगितला असता पती, सासू-सासरे व दिराने विवाहितेसह तिच्या आईला मारहाण केली असल्याची घटना अहमदनगर शहरातील एका उपनगरात घडली. पीडित विवाहितेने तोफखाना

पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू-सासरे व दिराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विवाहितेच्या पतीनेही तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सासू-सासरे व पत्नीने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी दुपारी विवाहिता घरातील किचनमध्ये एकटीच असताना तिच्या दिराने किचनमध्ये प्रवेश

करून विनयभंग केला. दिराने केलेला प्रकार विवाहितेने पतीला सांगितला. दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी विवाहितेच्या पतीने घरामध्ये सर्वांना एकत्र बोलावून घेतले. त्यावेळी

विवाहिता, तिचे आई-वडिल, पती, सासू-सासरे व दीर एकत्र जमलेले असताना विवाहिता व तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे.

तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पत्नीसोबत वाद सुरू असताना तिने फोन करून तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. तिचे आई-वडिल माझ्या घरी आले असता

आमच्या मुलीचे पैसे का घेतले? आमचे पैसे देऊन टाका, असे म्हणून मला मारहाण केली असल्या0चे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी

परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून पुढील तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!