Tuesday, May 24, 2022

याठिकाणीहून नगरमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.यामुळे जिल्ह्यातील मेडिकल विक्रेते मध्ये खळबळ उडाली आहे.

झाले असे की एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत आढळून आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा औषध प्रशासन व एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला होता. हा साठा पंचकुला (हरियाणा) येथील

आयव्हीए हेल्थ केअर या कंपनीतून अहमदनगर शहरातील श्रीराम एजन्सीकडे आल्याचे तपासात समोर आले आहे.याप्रकरणी मंगळवारी रात्री श्रीराम एजन्सीचे मालक नितीन

जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि आयव्हीए हेल्थ केअर कंपनीच्या संचालक मंडळाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त

ज्ञानेश्वर दरंदले यांनी फिर्याद दिली आहे.आरोपींविरोधात भादंवि 34, 420, 468, 471 व औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कलम 18 (सी) 18 (ए) व 22 (सीसीए) शिक्षा

कलम 27 (बी) व 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 मे, 2022 रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने गर्भपाताच्या गाळ्यांचा साठा जप्त केला होता. सात

लाख 66 हजार 440 रूपये किंमतीचा साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा होता. बिल मात्र दुसर्‍या गोळ्यांच्या नावाचे असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे. यामुळे पोलीस व औषध प्रशासनाने

तो साठा जप्त करून तपास सुरू केला होता. त्यातील नमुने औरंगाबाद येथील शासकीय लॅबोरेटरीकडे पाठविले आहेत.तपासादरम्यान श्रीराम एजन्सीचे मालक नितीन बोठे हा गर्भपाताच्या

औषध विक्रीचा विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. याबाबत त्याला 9 मे, 2022 रोजी नोटीस देऊन खुलासा करण्यास सांगितले गेले होते. श्रीराम एजन्सी आंनद बाजार,

पटवर्धन चौक या जागेत कार्यरत नसून त्याऐवजी ते त्यांच्या राहत्या घरातून 30 शिवनेरी पंकज कॉलनी टी.व्ही.सेंटर या जागेतु विनापरवाना औषधाची खरेदी व विक्री करत असल्याचे कळविले आहे.

सर्व बाबी विचारात घेता गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषधाचा काळाबाजार करणारे खुप मोठे रॅकेट असण्याचे बोठे याने मान्य केले. परंतु औषधाचा साठा त्यांचा नसल्याचे त्याने सांगितले.

यावरून तो तपास कामात सहकार्य करत नसल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणी सखोल तपास होणे

आवश्यक असल्याने आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!