Wednesday, May 25, 2022

भेंडाखुर्द मध्ये घरचा कडीकोयंडा तोडून 55 हजाराची चोरी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा खुर्द येथील अंगणवाडी सेविका रंजना उत्तम खरात यांच्या रहात्या घराचा बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

याबाबत अधिक माहीती अशी की, अंगणवाडी सेविका रंजना खरात त्यांच्या बहिनीकडे नेवासा फाटा येथे गेल्या असता पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करुन मौल्यवान वस्तु आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.यात सँमसंग कंपणीचा 15 हजार रुपये किंमतीचा एल्ईडी टिव्ही,15 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण,20 हजार रुपये रोख रक्कम व 5 हजार रुपये किंमतीचा पॅनासॉनिक कंपणीचा मोबाईल असा एकूण 55 हजार रुपये किंमचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
अंगणवाडी सेविका रंजना खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजिराव पोवार यांनी कुकाणा दुरक्षेत्र पोलिसांना चोरीच्या घटनेचा तपास लावण्याचा आदेश दिला असून नगर येथील पोलिस पथकाने ही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. लवकरच पोलिस चोरट्यांना जेरबंद करु असा विश्वास तपासी हवालदार बाबासाहेब कोळपे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!