माय महाराष्ट्र न्यूज:बाथरूममध्ये लपून छपून सेक्स करण्याची इच्छा एका महिलेच्या जिवावर बेतली आहे. तिचा मृत्यू झाला असून ती त्यावेळी अंमली पदार्थाच्या नशेत असल्याचंही आढळलं आहे.
ही घटना ब्रिटनच्या स्टॅफोर्डशायर इथली आहे. इथे राहणारी सँड्रा मरे ही महिला तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या घरातून एका माणसाला बाहेर पडताना इमारतीच्या सुरक्षा
रक्षकाने पाहिलं होतं. त्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पोलिसांना पाचारण केलं होतं.पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा ती घरातल्या बाथरूममध्ये
विवस्त्रावस्थेत आढळली होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तेव्हा तिचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं आढळलं.वास्तविक सँड्रा ही शरीरविक्रय
देखील करत असे. तिला अंमली पदार्थाचं व्यसन होतं. ती मरण पावली त्या रात्री तिच्यासोबत एक पुरुष होता. तिने मंकी डस्ट नावाच्या एका अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं. त्याचे घटक
तिच्या शरीरात आढळले. तसंच तिचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने झाला होता. तिने अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातच तिला मृत्यू आला.