Tuesday, May 24, 2022

Facebook वरुन दर महिन्याला कमवा 3 लाख रुपये, नेमकं कसं?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: Instagram Reels हे खूप लोकप्रिय फीचर आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी Meta ने फेसबुकवर देखील शॉर्ट-व्हिडिओ

फीचर आणलं आहे. आता फेसबुक यूजर्संना तब्बल 3 लाख रुपये कमावण्याची संधी देत ​​आहे.यासाठी यूजर्संना ओरिजिनल कंटेंट तयार करावा लागणार आहे. कंपनीने फेसबुकवर

Challenges सादर केले आहेत. यामुळे क्रिएटर्संना Reels Play बोनस कार्यक्रमात सहभागी होता येईल. मेटा ने म्हटले आहे की, ते पेआउट कसे कॅलक्युलेट केले जावे याबाबत काम सुरु आहे.

हे त्या क्रिएटर्सला रिवॉर्ड मिळणार आहे जे हाय-क्वॉलिटी ओरिजिनल कंटेट तयार करतील. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, एका महिन्यात क्रिएटर्सला $ 4000 (सुमारे 3 लाख रुपये) पर्यंतचे

बक्षीस दिले जाईल. कार्यक्रमाचे सर्व क्रिएटर्स दर महिन्याला चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकतात.पहिले चॅलेंज पूर्ण केल्यावर, दुसरे चॅलेंज अनलॉक होईल!उदाहरणार्थ, जेव्हा तुमचे 5 रील

100-100 वेळा प्ले केले जातील तेव्हा कंपनी $20 चे बक्षीस देईल. हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर क्रिएटरसाठी आणखी एक चॅलेंज अनलॉक होईल. म्हणजेच, 5 रील्स चॅलेंज पूर्ण केल्यानंतर, क्रिएटरला एक

नवीन चॅलेंज मिळेल, ज्यामध्ये त्यांचे 20 रील्स हे 500-500 वेळा प्ले झाले तर कंपनी त्यांना 100 डॉलर्सचे बक्षीस देईल.Challenges वर क्रिएटर्सचं प्रोगेस दर 30 दिवसांच्या बोनस

पीरियडनंतर पुन्हा रँक केली जाईल. यामध्ये यूजर्सना इतरांच्या कंटेंटची कॉपी केल्याबद्दल कोणतेही रिवॉर्ड दिले जाणार नाही. यावर, यूजर्संना केवळ ओरिजिनल कंटेंटसाठी पैसे दिले जातील.

फेसबुकने गेल्या वर्षी 150 हून अधिक देशांमध्ये शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग फीचर Reels लाँच केले आहे. यामध्ये रील यूजर्संसाठी नवीन एडिटिंग टूल्स देखील जोडण्यात आले आहेत.

यामध्ये व्हिडिओ क्लिपिंग आणि इतर टूल्सचा देखील समावेश आहे.फेसबुक आपल्या बिझनेसच्या दृष्टीने सातत्याने नवनवे प्रयोग करत असतं. तसंच आपल्या यूजर्संना देखील यातून फायदा होईल.

ही व्यावसायिक बाब लक्षात ठेऊन फेसबुक आता रिल्सचं फीचर घेऊन आलं आहे. त्यामुळे इंस्टाग्राम रिल्सनंतर फेसबुक रिल्सला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!