Monday, May 23, 2022

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीसोबत घडला असा प्रकार, ज्याचा तिने विचार देखील केला नसावा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, कारण यानंतर ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असते.

ज्यामध्ये नवीन लोक आणि नवीन जागेला तिला आपलंसं करायचं असतं. शिवाय सगळ्या जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या असतात. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री जर त्या मुलीच्या संसारात वादळ

आलं तर? आपण विचार देखील करु शकत नाही. अशी घटना एका महिलेसोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री घडली आहे.कानपूर जिल्ह्यातील मंगळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा

सगळा प्रकार घडला. येथील एका गावात दिवसा विवाह सोहळा पार पडला आणि काझींनी वधू-वरांना विवाहाचा स्वीकार केला.वधू आणि वर आनंदाने आपल्या घरी गेले. परंतु सकाळी

उजाडताच वधूने आपल्या पहिल्या रात्रीचा जो काही किस्सा आपल्या घरातल्यांना सांगितला, ते ऐकून सर्वांच्याच पाया खालची जमीन सरकली.ज्यानंतर नववधूचे वडिल पोलिसांना घेऊन

आपल्या मुलीच्या सासरी पोहोचले आणि नवरदेवावर गुन्हा नोंदवला.लग्न होऊन जेव्हा नववधू आणि नवरदेव घरी पोहोचले तोपर्यंत सर्वकाही ठिक होतं. परंतु हे दोघेही जेव्हा खोलीत गेले.

तेव्हा मात्र नवरदेवाने नववधूला मारझोड करायला सुरुवात केली. खरंतर खोलीत नववधू एकटीच गेली होती, तेव्हा नवरदेव आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. अखेर नववधू त्याची वाट पाहून झोपली.

रात्री उशीरा जेव्हा नवरदेव घरी आला, तेव्हा त्याने पाहिले की, नववधू झोपली होती.नवरदेवानं नववधूला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती उठली नाही, ज्यामुळे त्याने आपल्या कमरेच्या पट्ट्याने

नववधूला मारायला सुरुवात केली. ज्यामुळे नववधू खूप रडू लागली. शेवटी जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नववधूच्या घरच्यांचा विचारपूस करण्यासाठी फोन आला, तेव्हा तिने आपल्या

नवऱ्याची वागणूक घरच्यांना सांगितली. ज्यामुळे नव्या नवरीची हळद उतरण्यापूर्वीच ती आपल्या नवऱ्यापासून वेगळी झाली आणि आपल्या माहेरी परतली.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!