माय महाराष्ट्र न्यूज:प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेक वेळा चर्चेत असते. अनेक वेळा ती आपल्या सोशल मीडियावरुन
वादग्रस्त पोस्ट करते. आजही तिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट
पाहतो नरक, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली आहे.केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर केतकी सोशल
मीडियावरून तिचं मत मांडत असते. टोकाची मते लिहिल्याने अनेकदा केतकीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत टीका करणारी फेसबुक पोस्ट केतकीने केली आहे.
समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप
ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर
भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा
खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड
याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड
शरद पवार यांचं साताऱ्यातील भाषण चर्चेत आहे. शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कविता म्हटली.
त्या कवितेत पवारांनी हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने केली. भाजपच्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं. पवारांच्या याच कवितेचा धागा पकडून केतकीने
पवारांना ब्राह्मणद्वेष्टा म्हटलं आहे. ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू, तू तर मच्छर, अशा खालच्या शब्दात तिने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.