Saturday, July 2, 2022

घरापासून बाहेर पडताच कशी असते भारतीय महिलांची सेक्स लाईफ: धक्कादायक सर्वे समोर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजही भारतात लोकं सेक्सबद्दल बोलणं टाळतात. मात्र सेक्ससंदर्भात वाटणारी लाज आणि संकोच लोकांना धोकादायक आजारंही देऊ शकतात.

नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्वेक्षणात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले.

यामध्ये प्रथम लैंगिक संबंध ठेवण्याचं वय, सेक्सुअल पार्टनर्सची संख्या आणि लैंगिक संबंधासाठी पैसे देण्याबाबत गोष्टींचा समावेश होता.नॅशनल फॅमिली हेल्थच्या रिपोर्टमध्ये नमूद

केल्यानुसार, एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर, लग्न झालेला जोडीदार किंवा घरात राहणाऱ्या जोडीदाराशिवाय इतरांशी शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

दरम्यान सरकारच्या या अहवालातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असल्याचं दिसून आलं. लोक

एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला.

घरातून बाहेर पडल्यावर पुरुषांच्या तुलनेत महिलांचं लैगिंक संबंधांचं प्रमाण वाढलं आहे. जेव्हा महिला एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक वेळ घरारासून दूर असतात, तेव्हा सेक्सुअल पार्टनर्सची

संख्या 1.7 च्या सरासरीच्या तुलनेत 2.3 पर्यंत वाढल्याचं दिसून आलं. तर पुरुषांसाठी ही सरासरी 2.1 राहते.या सर्व्हेक्षणाअंतर्गत, 56 टक्के महिलांनी सांगितलं की, घरातून दूर गेल्यावर त्या

लैंगिक संबंध ठेवतात. तर घरापासून दूर राहिल्यानंतर केवळ 32 टक्के पुरुष शारीरिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं.या सर्व्हेमध्ये 15-49 वयोगटातील महिला आणि पुरुषांना गेल्या

12 महिन्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 1 टक्क्यांहून कमी महिलांनी (0.3 टक्के) आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे मान्य केलं.

एका टक्क्यापेक्षा कमी महिला (0.5 टक्के) आणि 4 टक्के पुरुषांनी सांगितलं की, त्यांचे जोडीदार किंवा घरात राहणार्‍या व्यक्तीशिवाय त्यांचे इतर कोणाशीही शारीरिक संबंध आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!