माय महाराष्ट्र न्यूज:पंजाबच्या भगवंत मान सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दूध खरेदीच्या दरात 55 रुपयांनी वाढ केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार
सध्या चाऱ्यापासून ते जनावरांपासून सर्वच उत्पादनांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत सध्याच्या दराने दूध विक्री केल्यास तोटा सहन करावा लागत आहे. या मागणीवरून राज्य
सरकारने दूध खरेदीच्या दरात वाढ केली आहे.पंजाबचे सहकार मंत्री हरपाल सिंग सीमा यांनी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति किलो दुधाच्या फॅटवर आधारित दूध खरेदी
दरात 55 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या खरेदी दरात वाढ
झाल्यामुळे विक्री दरात कोणताही परिणाम होणार नाही, असे मंत्री हरपाल सिंग म्हणाले.प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन (पीडीएफए) च्या नेतृत्वाखाली दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी
21 मे रोजी मोहाली येथे सार्वजनिक क्षेत्रातील दूध डेअऱ्यांनी दूध खरेदीच्या किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुधाच्या फॅटच्या आधारे खरेदी दरात प्रतिकिलो
100 रुपये वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, सरकारने दूध खरेदीच्या दरात प्रतिकिलो फॅट 55 रुपयांनी वाढ केली आहे.