Saturday, July 2, 2022

नगर ब्रेकिंग: हॉटेलमधील वेश्याव्यवसायावर छापा तीन महिलांची सुटका तर चार जणांना अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात हॉटेल लोकसेवा येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर

एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. तीन पीडित महिलांची सुटका करून चार जणांना अटक केली आहे. एक जण पसार झाला आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई केली असून

या प्रकरणी पाच जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गणेश कावरे यांनी फिर्याद दिली आहे.जुबेर जमालभाई शेख (वय 42), भैय्या

ऊर्फ सरफराज जमालभाई शेख (दोघे रा. खोसपुरी), सतिष दशरथ होंडे (वय 35), संदीप राजेंद्र वांढेकर (वय 36) व सोमनाथ छगन घागरे (वय 28, तिघे रा. राघुहिवरे ता. पाथर्डी) अशी गुन्हा

दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जुबरे जमालभाई शेख व भैय्या ऊर्फ सरफराज जमालभाई शेख हे दोघे भाऊ त्यांच्या खोसपुरी येथील लोकसेवा हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवित होते.

याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या

मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने पहाटे छापा टाकला.

यावेळी तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली.याठिकाणी हॉटेल मालक जुबेर शेखसह तीन ग्राहक मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.

भैय्या ऊर्फ सरफराज शेख पसार झाला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 11 हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!