माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात वर्षाला वीज पडून किमान 2500 लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान मे, जून, याकाळात वीज पडून दुर्घटना होतात.
यावर उपाय म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे.
या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी
वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच
विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.यामध्ये विशेषतः शेतकरी व शेतमजुरांची संख्या अधिक आहे. गेल्या चार वर्षात
काही नागरिकांसह अनेक जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वीजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी
सदर दामिनी ॲप उपयोगी ठरत आहे. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था ( आयआयटीएम ) या संस्थेने हे ॲप विकसित केले आहे.वीजा पडण्याची शक्यता तसेच वीज
म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि वीजांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर माहिती ‘दामिनी’ ॲपमध्ये देण्यात आली आहे.
या ॲपवर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा वीजांच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळत असते, त्यामुळे या माहितीचा आधारावर शेतकरी व नागरिक
वेळीच सावध होऊन त्यांच्या जीव वाचवू शकतात. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबत, तसेच स्थानिक पातळीवर गावस्तरीय
कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सामान्य नागरीक / शेतकरी यांना हे अॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.