Friday, July 1, 2022

मोठी बातमी:महाराष्ट्रात लोकसभेच्या ८ जागांवर भाजपचे मायक्रो प्लॅनिंग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने ‘मिशन २०२४’ ची आखणी केली आहे.

यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याच्या जोडीलाच विजयासाठी संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष देण्यास भाजपने सुरुवात केली आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून

पक्षाने देशभरातील अशा १४४ जागांवर २०२४ मध्ये जोर लावण्याचे ठरविले आहे जेथे भाजप उमेदवार गत निवडणुकांमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

या मतदारसंघांची जबाबदारी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना वाटून देण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील भाजपने असे ८ मतदारसंघ निवडले असून या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय

हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी

पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार, भाजप कार्यकर्ते व संघ प्रचारक यांच्याशी समन्वय साधून या नेत्यांनी या मतदारसंघांत भाजपचा खुंटा बळकट करायचा आहे.

या जागांवर संबंधित मंत्र्यांनी दर दोन ते तीन महिन्यांनी प्रत्येकी किमान ३ दिवस मुक्काम करावा व मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसारही करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच तेथील कमकुवत बूथ व विधानसभा मतदारसंघांचाही आढावाही त्यांनी घ्यायचा आहे. याशिवाय राज्यातील शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांवरही विशेष फोकस ठेवण्याचे

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे नियोजन आहे. कारण सेनेचे खासदार २०१९ मध्येही मोदींच्याच नावावर लोकसभेत पोहोचल्याचा पक्षाचा दावा आहे.भाजपने ‘मिशन १४४‘ मधील साऱ्या

जागांची विभागणी ४० उपविभागांत केली आहे.देशभरातील ७४ हजार असे बूथ भाजपने हुडकून काढले आहेत जेथे पक्षाचे संघटन अत्यंत कमकुवत आहे. या बूथची जबाबदारी त्या

त्या भागातील खासदार, आमदार, नगरसेवक व बूथप्रमुख यांच्यावर राहील.सत्तरी पार केलेल्यांची तिकीटे २०२४ मध्ये कापायची हा संघप्रणित फॉर्म्यूला प्रत्यक्षात आणण्याचे भाजपने ठरविले

तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदींचा अपवाद अपरिहार्य ठरणार आहे. यासाठी १९५६ च्या अगोदर जन्म झालेले खासदार असा निकष लावण्यात येऊ शकतो.

२०२४ पर्यंत सध्याच्या ३०१ पैकी सुमारे २५ टक्के म्हणजे ८१ खासदार सरळसरळ बाद होत आहेत. त्यात राज्यातील रावसाहेब दानवे, गिरीश बापट,गोपाळ शेट्टी, सुभाष भामरे, जयसिध्देश्वर

स्वामी व रामदास तडस आणि गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!