Thursday, June 30, 2022

महाराष्ट्रात याठिकाणी पार पडली ‘लिंग परिवर्तन’ शस्त्रक्रिया; पुरूषाचं झालं महिलेत रुपांतर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: स्त्री किंवा पुरुषाचा देह घेऊन जन्म घेतला असला, तरी त्या देहातील मन विरोधी लिंगी असल्याची जाणीव झाल्यानंतर जगणेच अस्वस्थ होते.

क्वचितप्रसंगी मुलांना आपण मुलगा असूनही मुलगी असल्याचा भास होतो. काही मुलींमध्ये पुरुषाप्रमाणे लैंगिक वर्तन दिसतं, त्यांच्यात पुरुष होण्याची आस अधिक असते. तर

काही मुलांना आपण मुलगी असल्याचा भास होतो. त्यामुळे आपल्या मनाचा आवाज ऐकून प्लॅस्टिक सर्जरी ऑपरेशनद्वारे लिंग परिवर्तन करून घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. सोलापूर

जिल्ह्यातही अशीच एक लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.सोलापुरातील ऍडोरा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची

शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. शरण हिरेमठ यांनी ही किमया करून दाखवली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी एका पुरुषाच महिलेमध्ये रूपांतर केलं आहे.

संबधित तरुणाच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर आणि मानसिकरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच ही लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे.

लिंग परिवर्तन करणाऱ्या तरुणाने त्यांची ओळख गुपित ठेवली असल्याने या तरुणाबाबत अधिक माहिती मिळून शकलेली नाही. त्यांची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, सुरूवातीला

फक्त विदेशात होणारी ही शस्त्रक्रिया आता भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही होत असल्याने अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे.

या शस्त्रक्रियेसाठी साधारण एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे. त्याचबरोबर लिंग परिवर्तनानंतर पुरूषातून महिलेमध्ये परिवर्तन

झालेल्या महिलेला मुलाला जन्म देता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!