Thursday, June 30, 2022

सोनई पोलीसांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत शास्त्रीनगर,चांदा,ता.नेवासा भागात राहाणारा पोलीस ठाणे सोनई येतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उत्तम फुलमाळी (वय २१ वर्षे) या गुन्हेगारास सोनई पोलीसांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे आदेशाने अवैध अग्नीशत्र विरुध्द विशेष मोहिमे अंतर्गत सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग यांचेकडील जारी झालेल्या सर्चवॉरन्टचे अनुषंगाने आज दि. २८/५/२०२२ रोजी सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत शास्त्रीनगर चांदा ता नेवासा भागात राहाणारा पोलीस ठाणे सोनई येतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उत्तम फुलमाळी (वय २१ वर्षे) याचे राहाते घराची जारी झालेले सर्च वॉरन्टचे आधारे सोनई पोलीसांनी शासकीय पंचाचे उपस्थीतीत घराची झडती घेतली असता सदर इसमाचे कब्जात राहाते घरामधुन २५ हजार रुपये किंमतीचे देशी बनवाटीचे पिस्तुल (गावठी कट्टा) स्टील प्लेटेट मॅगझीनसह, मुठीस दोन्ही बाजुस लाल रंगाच्या प्लास्टीक धातुच्या प्लेट्स लावलेल्या व त्यावर इंग्रजीत U.S.A व त्यापुढे स्टाफ असे चिन्ह व अक्षरे असलेले जुना वापर अंदाजे
२०० रुपये किंमतीचे सदर पिस्तुलचे मॅगझीनमध्ये मिळुन आलेले एक जिवंत काडतुस मागील गोलाकार भागावर K.F ७.६५ अशी अक्षरे, अंक असलेला असा २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमालासह सदर इसमास सोनई पोलीसांनी जेरबंद केले आहे.

सदर प्रकरणी अवैध अग्नीशस्त्र बागळले प्रकरणी पो.हे.कॉ अनंता गायकवाड सोनई पोलीस ठाणे यानी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गुन्हा रजि नं १७१/२०२२ भारतीय शस्त्र अधिनियम कायदा १९५९ चे कलम ३/२५,७/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी इसम नामे अशोक उत्तम फुलमाळी (वय २१ वर्षे) यास या दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी इसम याचे विरुध्द यापूर्वी सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि नं १६० / २०२१ आर्म अॅक्ट का.क. ३ / २५, ७ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक निरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी चौधरी, नेवासा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सोनई पोलीस ठाणेचे पो. उ. निरीक्षक उमेश पतंगे, सहा.उपनिरीक्षक निरीक्षक संजय चव्हाण, पो.हे.कॉ दत्ता गावडे, पो. हे कॉ अनंता गायकवाड, पो.ना. बाबा वाघमोडे, पो. ना. सोमनाथ झांबरे, पो. कॉ विठ्ठल थोरात, पो.कॉ सचिन ठोंबरे, पो. को मृत्युंजय मोरे, पो.कॉ तमनर, पो.कॉ जावळे, पो.कॉ आघाव, महिला पोलीस कॉ. कमल आघाव, चालक पो.कॉ सुनिल ढोले, म.पो.कॉ मनिषा नरोटे, म.पो.कॉ बेबी गोरे सर्व नेम सोनई पोलीस ठाणे यांनी ही कार्मागरी केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!