Sunday, July 3, 2022

आधार कार्डबाबतचा ‘तो’ मोठा निर्णय केंद्र सरकारकडून तात्काळ मागे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:आधार कार्डशी संबंधित जो नवा आदेश जारी करण्यात आला होता तो अखेर मोदी सरकारने मागे घेतला आहे. चहूबाजूंनी विरोध

 

झाल्यानंतर सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतला आहे. तसेच, हा एक सामान्य स्वरुपाचा आदेश असल्याचं आता केंद्र सरकारनं म्हटलं आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने

 

एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चा नवीन आदेश तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आला आहे. यामुळे गैरसमज होण्याची शक्यता लक्षात

 

घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. UIDAI ने आधार क्रमांक शेअर करण्याच्या सामान्य प्रक्रियेबद्दल सल्ला देण्यासाठी ही प्रेस रिलीज जारी केली होती. ही एक सामान्य प्रक्रिया आहे.’

 

यासह, सरकारने सामान्य लोकांना पुन्हा आश्वासन दिले की Aadhaar ओळखण्याची इकोसिस्टम सुरक्षित आहे. कार्डधारकाची ओळख आणि गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी पुरेसे सुरक्षा फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.

 

 

UIDAI च्या बंगळुरू प्रादेशिक कार्यालयाने अलीकडेच एक नवीन आधार आदेश जारी केला होता. यामध्ये लोकांनी आधार कार्डची छायाप्रत कोणत्याही संस्थेला देऊ नये, कारण त्याचा

 

गैरवापर होऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. त्याऐवजी तुम्ही मास्क केलेले आधार वापरू शकता. तुमचा पूर्ण 12 अंकी आधार क्रमांक मास्क्ड असल्याने दिसत नाही (What is Masked Aadhaar in Marathi?).

 

त्याऐवजी आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक त्यात दिसतात. आपण ते ऑनलाइन देखील मिळवू शकता.यासोबतच लोकांना असेही सांगण्यात आले की, परवाना

 

नसलेल्या खाजगी संस्था त्यांचे आधार गोळा करू शकत नाहीत किंवा ते त्यांच्याकडे ठेवू शकत नाहीत. यामध्ये विनापरवाना हॉटेल्स आणि सिनेमा हॉलचा समावेश आहे. अशा परिस्थितीत,

 

कार्ड धारकांनी आधार तपशील फक्त अशा संस्थांशी शेअर केला पाहिजे ज्यांच्याकडे UIDAI कडून घेतलेलं यूजर परवाना आहे.UIDAI च्या या सल्ल्याबाबत सरकारवर मोठ्या प्रमाणावर

 

टीका झाली होती. सोशल मीडियावर असे म्हटले जात होते की, सरकारने ही अॅडव्हायझरी जारी करण्यास उशीर केला, कारण लोक जवळपास 10 वर्षांपासून आधार कार्ड वापरत आहेत.

 

त्याच वेळी, सर्वत्र अनिवार्य केल्याबद्दल आणि नंतर त्याची फोटो कॉपी शेअर न केल्यामुळे जारी करण्यात आलेल्या या अॅडव्हायझरीवर अनेकांनी टीका केली.

 

याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्सही शेअर केले जात आहेत.

 

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!