Saturday, July 2, 2022

आता पीएम आवास योजनेत तिप्पट रक्कम मिळणार ? सरकारची नवीन योजना जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक माणसासाठी स्वत:चे घर असणे हे मोठे स्वप्न असते. मात्र अनेकदा घरांच्या किंमती किंवा बांधकामाचा खर्च हा

अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असतो. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. तुम्ही देखील प्रधानमंत्री आवास योजनेचे (PM Awas Yojana)

लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. आता या विशेष योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये अर्थात आधीच्या तिप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. आता घरे बांधण्याचा

खर्च (House Construction Cost)वाढल्याचे समितीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता रक्कमही वाढवायला हवी. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत

पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील. या नव्या प्रस्तावात काय आहे ते जाणून घेऊया.खरं तर, यापूर्वी झारखंड विधानसभेच्या अंदाज समितीने राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत

घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याची शिफारस केली होती. समितीचे अध्यक्ष दीपक बिरुआ यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंदाज समितीचा अहवाल सभागृहाच्या

पटलावर ठेवला. झामुमोचे आमदार दीपक बिरुआ म्हणतात की, प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. प्रत्यक्षात वाळू, सिमेंट, रॉड, विटा, गिट्टी यांच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत

बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती वाढल्या आहेत.दारिद्य रेषेखालील कुटुंबे ५० हजार ते एक लाख रुपये देऊ शकत नाहीत, असे बिरुआ यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य

सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या पीएम आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत 1.20 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात यावी, जेणेकरून घरे प्रत्यक्ष बांधता

येतील आणि लोक त्यासाठी पुढे येतील. त्याचबरोबर राज्याचा हिस्सा वाढविण्याचा विचार राज्य सरकार करू शकते, असेही ते म्हणाले.अनेकांना घर बांधणे किंवा विकत घेणे शक्य होत नाही.

ही समस्या लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरजूंना घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते आहे.

सर्वसामान्य माणसाचे जेव्हा घराचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. असाच एक प्रसंग घडला आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एक गरीब व्यक्तीच्या बाबतीत.

पीएम आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यावर या माणसाने पंतप्रधानांच पत्र लिहिले होते. पंतप्रधान मोदींनीदेखील या पत्राला प्रतिसाद दिला होता.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!