Friday, July 1, 2022

शेतकऱ्यांचे सोने सोयाबीनला यंदा भाव तेजीत….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. यंदाच्या हंगामात किरकोळ दिवस सोडले तर सोयाबीनच्या भावाला

कायम तेजी दिसून आली आहे. दरम्यान या मिळणाऱ्या भावामुळे अस्मानी संकट आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

याचबरोबर मागच्या चार दिवसांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळत असला तरी यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादन वाढणार असल्याचे कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतांची मशागत करून ठेवली असली तरी पेरणी सारखा पाऊस झाला नसल्याने पेरणीची घाई करू नये असे कृषी

विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान नागपूरमध्ये मॉन्सून लांबल्याने शेतकऱ्यांसह प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील सर्वांचीच चिंता वाढली आहे. परिणामी, सोयाबीनला चांगलाच भाव

मिळत आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनची 386 क्विंटल आवक झाली असून, दर 5 हजार 300 ते 6 हजार 290 रुपयांवरून 5 हजार 500 ते 6 हजार 450 रुपयांवर पोहोचले आहेत.

नागपूरच्या कळमना बाजार समितीत गेल्या महिन्यात सोयाबीनचे दर चांगले तेजीत होते. त्यानंतर दरात घसरण अनुभवण्यात आली. आता पुन्हा सोयाबीन दरात टप्प्याटप्प्याने

सुधारणा होत आहे. महाराष्ट्रातील 100, मध्य प्रदेशमधील 75 तर राजस्थानमधील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटलमागे 50 रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. बाजारातील

ही स्थिती पाहता येत्या काळात सोयाबीनचे दर आणखी तेजीत राहतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.सध्या मार्केटमध्ये सोयाबीनची आवक थांबली आहे यामुळे सोयाबीन प्रोसेसर

असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र सोयाबीनची उपलब्धता पर्याप्त असल्याचा दावा केला आहे. ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या कालावधीत सोया डिओसीच्या निर्यातीमध्ये 69.30 टक्के घट झाली.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!