नेवासा
राहते घराचे आसपास 4 लाख 21 हजार रुपये किंमतीचे 16 गोवंश जातीचे लहान-मोठी जनावरे कत्तल करण्यासाठी पिकअप जिप क्रमांक एमएच-17-अजी-3337 ही मधुन वाहतुक करुन आणुन सदरची जनावरे घरासमोर भुकेलेल्या व तहानलेल्या अवस्थेत दाव्यांनी करकचून बांधुन
ठेवल्या प्रकरणी नेवासा पोलिसांनी शाहजाद महंमद शेख (वय 23 वर्षे) रा. गिडेगांव रोड,सलाबतपुर ता. नेवासा यांचे विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत पाठविण्यात आली.
नेवासा पोलिस ठाण्यातील पो.कॉ. रामदास लक्ष्मण घेरे (वय 29 वर्ष) यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.12/6/2022 रोजी दुपारी मी व सहा. फौजदार एस. जी. ससाणे असे नेवासा पो.स्टे. येथे हजर असताना उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी मला व एस. जी. ससाणे, पोना, केदार, पोको गलधर, चालक पोको कुऱ्हाडे अशांना त्यांचे ऑफिस मध्ये बोलावून कळविले की, आताच अहमदनगर कंट्रोल रूम येथुन फोन आला आहे की,
शाहजाद महंमद शेख रा. गिडेगांव रोड, सलाबतपुर ता. नेवासा याचे राहते घराचे आसपास गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी आणून भुकेल्या व तहानलेल्या अवस्थेत बांधुन ठेवलेले आहेत. तसेच सदरचे जनावरे कत्तल करणेसाठी पिकअप क्रमांक एमएच-17- एजी-3337 चा वापर करतो ती घराचे समोर लावलेली आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाली असून सदर ठिकाणी छापा टाकुन गोवंश जातीची जनावरे मिळून आल्यास पुढील कार्यवाही करायची आहे असे कळवून लागलीच दोन लायक पंच अवधुत देवीदास लोळगे (वय 31वर्षे) रा. प्रवरासंगम ता. नेवासा व संतोष जगन्नाथ गायकवाड (वय 44 वर्षे) रा.नेवासा खुर्द ता. नेवासा अशांना बोलावून घेवून त्यांना बातमीतील नमुद हकीगत समजावून सांगुन त्यांना पंच म्हणून सोबत येणेस विनंती केली.
ते पंच म्हणून येणेस तयार झालेनंतर आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे नेवासा पो.स्टे. स्टेशन डायरी नोंद क्रमांक 11 वेळ 13:14 या नोंद करून सरकारी जिप क्रमांक एमएच-16 सीव्हि 0889 हि मध्ये बसुन रवाना होवून 14:15 वा. बातमीतील नमुद ठिकाणी शाहजाद महंमद शेख रा.गिडेगांव रोड, सलाबतपुर याचे राहते घरासमोर पोहचलो असता सदर ठिकाणी घराचे आसपास गोवंश जातीची जनावरे भुकेल्या अवस्थेत करकचुन दाव्याने बांधलेली दिसली. सदर जनावरा जवळ एक इसम उभा होता. आम्ही त्यास हटकताच तो पळून गेला. त्याचे नावाबाबत खात्री करता त्याचे नांव शाहजाद महंमद शेख (वय 23 वर्षे) रा.गिडेगांव रोड, सलाबतपुर असे असल्याचे व सदरचे घर त्याचेच असल्याचे समजले आहे.
सदर ठिकाणी मिळून आलेल्या जनावरांचे वर्णन खालील प्रमाणे…
4 हजार रुपये किंमतीचा एक दिड वर्षे वयाचा काळे पांढरे रंगाचा जर्सी गोऱ्हा, 10 हजार रुपये किंमतीचा एक दहा वर्षे वयाची तांबडया पांढरे रंगाची पुढे शिंगे असणारी गाय, 3 हजार रुपये किंमतीचा एक दिड वर्षे वयाचा काळे पांढरे रंगाचा गोऱ्हा, 5 हजार रुपये किंमतीचा एक काळे रंगाचा पांढरी शेपुट असलेला गोऱ्हा, 5 हजार रुपये किंमतीचा एक अडीच वर्षे वयाचा तांबडया रंगाचा गोऱ्हा, 2 हजार रुपये किंमतीचा एक 6 महीने वयाचा काळया पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा, 15 हजार रुपये किंमतीचा एक दोन वर्ष वयाचा पांढरा रंगाचा गोऱ्हा,13 हजार रुपये किंमतीचा एक काळे रंगाचा गळयाजवळ पांढरे ठिपके असलेला गोऱ्हा, 7 हजार रुपये किंमतीचा एक
9 महीने वयाचा काळे पांढरे रंगाचा गोऱ्हा, 5 हजार 500 रुपये किंमतीचा एक 6 महीने वयाचा काळे रंगाचा गोऱ्हा, 2 हजार 500 रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा एक तांबडा भुरका रंगाचा गोऱ्हा, 3 हजार रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा एक काळे पांढरे रंगाचा गोऱ्हा, 3 हजार रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा एक काळे पांढरे रंगाचा गोऱ्हा, 20 हजार रुपये किंमतीचा 5 वर्ष वयाचा एक पांढरे रंगाचा वाकडया शिंगाचा बैल, 20 हजार रुपये किंमतीचा 5 वर्षे वयाचा पांढरे रंगाचा वाकडया शिंगाचा एक बैल, 3 हजार रुपये किंमतीचा एक पांढरे काळे रंगाचा 2 महीने वयाचा गोऱ्हा, 3 लाख रुपये किंमतीचा एक पांढरे रंगाचा पिक अप जिप क्रमांक एमएच 17- एजी 3337 असा एकूण 4 लाख 21 हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीची जनावरे दाव्यांनी करकचून बांधलेली भुकेली व तहानलेली मिळून आली. सदरची जनावरे आम्ही सोबत आणलेल्या पंचासमक्ष उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. सदर जनावरांची जागीच पशुवैदयकीय अधिकारी सलाबतपुर यांना लेखी पत्र देवून त्यांचेकडुन तपासणी करुन घेतली. तसेच सदरची जनावरे सुरक्षीत ठेवून सांभाळ करण्यासाठी गोकुळधाम गोशाळा कायेगांव रोड, गंगापुर जि. ओरंगाबाद यांना लेखी पत्र देवून सांभाळ करुन सुरक्षीत ठेवण्यासाठी जमा केली आहेत.
या फिर्यादीवरून शाहजाद महंमद शेख (वय 23 वर्षे) रा. गिडेगांव रोड, सलाबतपुर ता. नेवासा यांचे विरुध्द
नेवासा पोलिस ठाण्यात भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधि नियम 1960 चे कलम 11(1) (एच) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.