Friday, July 1, 2022

भेंडा गावठाण वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरातील गावठाण वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याने सततच्या खंडित वीज पुरवठ्याने व्यापारी व घरगुती वीज ग्राहक त्रस्त झाला आहे.वेळोवेळी तक्रार करून ही वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे व ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा वीज उपकेंद्रातून भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द,गोंडेगाव सह इतर गावांना स्वतंत्र गावठाण वीज वहिनी मार्फत घरगुती वीज पुरवठा केला जात आहे. तातडीचा बिघाड अथवा वीज उपकेंद्राला होणारा वीज पुरवठा खंडित झालेच्या कारणाशिवाय इतर वेळी अखंडित वीज पुरवठा व्हावा हा स्वतंत्र गावठाण वीज पुरवठा योजनेचा हेतू आहे. मात्र भेंडा वीज उपकेंद्र याला अपवाद असल्याचे दिसून येत आहे.
उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना वाऱ्याची लहानशी झुळूक आली किंवा पावसाचे चार थेंब पडण्याचे कारणही ही गावठाण वीज पुरवठा खंडित करण्यास पुरेसे ठरत आहे.वीज वाहिनी मधील बिघाड झाल्याचे कारण पुढे करून बारा-बारा,चौदा-चौदा तास वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे.
आधल्या दिवशी संध्याकाळी 5/6 वाजता बिघाडामुळे वीज पुरवठा बंद झाला तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत बंदच रहातो, त्याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष.वीज कंपनीचे अधिकारी-कर्मचारी सदैव नॉट रीचेबल असतात,रीचेलब असले तरी फोन घेत नाहीत,घेतला तरी काम चालू आहे,येईल येईल असे उत्तरे देऊन वेळ मारून नेतात.

भेंडा गावठाणचा वीज पुरवठा  वेळी-अवेळी खंडीत होत असल्याने ग्राहक अक्षरश: त्रासले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा हा खेळखंडोबा सुरू आहे.ऐन धंद्याचे वेळीच वीज गायब होत असल्याने व्यापारी त्रस्त झालेले आहेत.त्यातच सध्या शाळा, कॉलेजेसकडून ऑनलाइन वर्ग सुरू झालेले आहेत. अद्यापही अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ कायम आहे. अशात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढतच आहे. केवळ देखभाल, दुरूस्ती अभावी हा बिघाड वारंवार होत आहे. हा वारंवार होणारा बिघाड कायम स्वरूपी दूर करावा अन्यथा कोणती ही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनी विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!