Saturday, July 2, 2022

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला;200 कारखान्यांकडून 1320.31 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत  हंगामात राज्यातील एकूण 200 साखर कारखान्यांनी हंगाम 2021- 2022 मध्ये 1320.31 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1372.78 लाख क्विंटल  साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 10.40 टक्के आहे.यंदाचा हंगाम सरासरी गाळप दिवस 173 चालला असून जास्तीत जास्त गाळप दिवस 240 तर कमीत कमी गाळप दिवस 36 आहेत.

या हंगाम अखेर राज्यातील 101 सहकारी व 99 खाजगी अशा एकूण 200 साखर कारखान्यांचे  विभाग निहाय झालेले  ऊस  गाळप, साखर उत्पादन,साखर उतारा खालील प्रमाणे–

———————————————-
विभाग– साखर कारखाने –ऊस गाळप लाख मे. टन–साखर उत्पादन लाख  क्विंटल–साखर उतारा टक्के
———————————————-
कोल्हापूर विभाग:- 36– 254.69 –300.41–11.80

पुणे विभाग:- 30– 269.87 –291.29–10.79

सोलापूर विभाग-47–300.68– 284.34– 9.46

अ.नगर विभाग:- 28– 200.54– 200.72– 10.01

औरंगाबाद विभाग:- 25– 132.83 –129.27–9.73

नांदेड विभाग:- 27– 147.12 –153.26–10.42

अमरावती विभाग:- 3–10.03 –9.67–9.64

नागपूर विभाग:- 4– 4.55 –3.82–8.40
———————————————-
एकूण -200–1320.31–1372.78–10.40
———————————————-
मागील हंगामाचा तुलनात्मक:-
190–1013.64–1064.08–10.50
———————————————-

*नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी 83 लाख
मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण…*

नगर जिल्ह्यातील  14 सहकारी व 9 खाजगी अशा एकूण 23 साखर कारखान्यांनी  गळीत हंगाम  2021- 22 अखेर 1 कोटी 85 लाख 17 हजार 909 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 85 लाख 25 हजार 518 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 10.10 टक्के आहे.
नगर जिल्ह्यातील एकूण 1 कोटी 85 लाख 17 हजार 909 मेट्रिक टन ऊसा पैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी
1 कोटी 26 लाख 85 हजार 183  मेट्रिक टन तर 9 खाजगी साखर कारखान्यांनी 58 लाख 32 हजार 726 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिलाह्यातील 14 सहकारी व 9 खाजगी अशा एकूण 23 साखर कारखान्यानी हंगाम 2021- 2022 अखेर केलेले ऊस गाळप,साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे–

—————————————-
अ.नं.–कारखाना–ऊस गाळप मे. टन–साखर उत्पादन क्विंटल– सरासरी उतारा टक्के
—————————————-
1)अंबालिका:-1951160– 2100650– 10.77

2) ज्ञानेश्वर:- 1659470–1699000 –10.24

3) संगमनेर:- 1546440– 1632090 — 10.55

4) मुळा:-1521220 –1337400– 8.79

5) गंगामाई:- 1404177– 1343200 — 9.57

6) श्रीगोंदा:- 894630– 978208 — 10.93

7) कुकडी:- 798008 — 800400 — 10.03

8) प्रवरा:- 1056860 — 762300 — 7.21

9) संजीवनी:- 943720 — 842750 — 8.93

10)कोपरगाव:- 797688 — 877500 — 11.00

11) अशोक:- 848430 — 948400 — 11.18

12) प्रसाद शुगर:- 766901– 770000 — 10.04

13)गणेश:- 398400– 305625– 7.67

14) राहुरी:- 485272 — 549925 — 11.33

15) वृद्धेश्वर:- 566165– 607600 — 10.73

16) अगस्ती:- 622600– 726350 –11.67

17)केदारेश्वर:- 546280 — 521600 — 9.55

18) साईकृपा,देवदैठण:- 250972 — 260700 –10.39

19) साईकृपा हिरडगाव:- 266878– 265780 — 9.96

20) जय श्रीराम:- 327027 — 312740 — 9.56

21) युटेक:- 443454 — 444200 — 10.02

22) क्रांती शुगर:- 143616 — 154875 — 10.78

23) पियुष:-278542 — 284225 — 10.2
———————————————-
एकूण :-18517909 — 18525518 — 10.10
———————————————-

यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झाले होते.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने  16 लाख 59 हजार 470 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून राज्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्यात तिसरा  तर राज्यातील सहकारी व खाजगी मध्ये सहावा क्रमांक  मिळविला आहे.तसेच 1699000 क्विंटल साखर निर्मिती करून साखर उत्पादनात ही ज्ञानेश्वर कारखाना राज्यात 5 व्या क्रमांकावर आहे.

*सन 2021-2022 या ऊस गळीत हंगामाचे वैशिष्ट्ये….*—————————–
*हंगाम 2021-22 मध्ये उच्चतम गाळप केलेले 10 साखर कारखाने…*

1)विठ्ठलराव शिंदे ता.माढा (2478922 मे.टन),2) जरंडेश्वर (1998330 मे.टन),3) अंबालिका ,नगर (1951160 मे.टन),4)जवाहर, हुप्परी (1907298.मे.टन)5)बारामती ऍग्रो (1731060 मे.टन),6) श्री. ज्ञानेश्वर (1659470 मे.टन),7) संगमनेर (1532360 मे.टन),8) माळेगांव (1526916 मे.ट,9) मुळा (1521220 मे.टन),10) गंगामाई (1404177 मे.टन)
—————————————
*राज्यात सर्वाधिक साखर तयार करणारे प्रमुख 10 कारखाने…*

1)’विठ्ठलराव शिंदे,माढा (2345000 क्विंटल),2) जवाहर,हुपरी (2313000क्विंटल),3) जरंडेश्वर (2313000 क्विंटल),4) अंबालिका (2100650 क्विंटल),5) माळेगाव (1739200 क्विंटल),6) ज्ञानेश्वर (1699000 क्विंटल),7) सह्याद्री 1692700 क्विंट,8) संगमनेर (1617230 क्विंटल),9) बारामती अग्रो. (1601600 क्विंटल),10) दत्त शिरोळ (1565500 क्विंटल)
——————————————

*राज्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारे प्रमुख कारखाने…*
1) दूधगंगा वेदगंगा, कागल (12.99 %),2) पंचगंगा-रेणुका शुगर्स, हातकणंगले (12.90 %), 3) सह्याद्री , कराड (12.66 %), 4) राजारामबापू पाटील युनिट 3, वाळवा (12.65 %) 5) सोनहिरा, कडेगाव (12.54 %),6) अथणी शुगर्स, भुदरगड (12.51 %),7) भोगावती (12.50 %), 8)ओलम अॅग्रो,चंदगड (12.51 %),9) कुंभी कासारी,करवीर (12.44 %),10) इको केन एनर्जी, चंदगड (12.38 %)

——————————————–
*उसाला सर्वाधिक भाव देणारे प्रमुख कारखाने…*
1)’दूधगंगा वेदगंगा, कागल (3133.35 रुपये),2) ‘राजाराम बापू पाटील ससाका’, वाळवा युनिट (3044.23 रुपये),3) भोगावती ससाका, करवीर (3043.73 रुपये),4) पंचगंगा ससाका, हातकणंगले (3038.00 रुपये),5) सोनहिरा ससाका, कडेगाव (2977.62 रुपये),6) कुंभी कासारी ससाका, करवीर (2971.62 रुपये),7) राजाराम बापू पाटील ससाका’, वाळवा युनिट-2 ( 2888.97 रुपये), 8) रयत संसाका, कराड (2882.20 रुपये),9) पद्मश्री डी. वाय. पाटील ससाका (2865.86 रुपये),10) सदाशिवराव मंडलिक ससाका’, कागल (2864.19 रुपये)
——————————————–

*31 मे 2022 रोजीची एफआरपी थकबाकी सारांश…*

*गाळप घेतलेले कारखाने– 199
*एकूण ऊस गाळप– 1302.75 लाख मे. टन
*एफआरपी प्रमाणे देय ऊस किंमत– 39582.32 कोटी रुपये
*एफआरपी प्रमाणे अदा रक्कम– 37712.36 कोटी रुपये
*थकीत एफआरपी — 1869.96 कोटी रुपये
*एफआरपी अदा प्रमाण– 95.28 टक्के
*एफआरपी थकबाकी प्रमाण–4.72 टक्के
*100% एफआरपी दिलेले कारखाने संख्या — 65
*एफआरपी थकीत असणा-या कारखान्यांची संख्या– 134
अ) 80-99% FRP दिलेले कारखाने संख्या– 103
ब) 60-79% FRP दिलेले कारखाने संख्या –25
(क ) 0-59% FRP दिलेले कारखाने संख्या — 05
*वसुली कारवाई (RRC) केलेले कारखाने संख्या– 04

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!