माय महाराष्ट्र न्यूज:उन्हाळ्यात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे
चाळीची व्यवस्था नाही, त्यांनी पावसाळ्यापूर्वीच कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. परंतु, मे अखेरपर्यंत कांद्याला अवघा ८०० ते १ हजार १०० प्रतिक्विंटल दर मिळत होता. परंतु, जूनच्या
पहिल्या आठवड्यापासूनच हा दर दीड ते दोन हजार प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला.कांद्याचे दरातील चढउतार नेहमीच चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
कांदा उत्पादक शेतकरी आहेत. प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात उत्पादीत झालेला कांदा अत्यल्प दरामुळे चाळीत भरला गेला. मे महिन्यात तीन नंबर
कांद्याला प्रतिकिलो १ रूपया ते ६ रूपये प्रतिकिलो एवढाच भाव मिळाला. हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तसेच कांद्यांचा आकारही अपेक्षेपेक्षा लहान राहिल्याने
शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यातच अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले. ही परिस्थिती मेअखेरपर्यंत कायम होती. परंतु, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून
या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत कांद्याला दिड ते दोन हजारापर्यंत भाव मिळतो आहे.