Thursday, June 30, 2022

मोठी बातमी:शरद पवार नाही तर महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी हा व्यक्ती निवडणूक लढवणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात राष्ट्रपती निवडणुकीची तयारी सुरु आहे. विरोधी पक्ष नेत्याकडून सर्व पक्षाचा मिळून एकचं उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे.

तर भाजप आपला वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे या निवडणूकीत कॉंटे की लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे

सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यामुळे त्यांचे नावाव्यतिरक्त आता दुसऱ्या नावांवर चर्चा सुरु आहे. शरद पवारानंतर आता महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी आणखी एका उमेदवाराचे नाव चर्चेत आले आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचूकले राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. आपण राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहोत आणि काही आमदार-खासदारांशी संपर्कात

आहोत, असं अभिजीत बिचुकले यांनी सांगितले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना विचारले असता अभिजीत बिचुकले म्हणाले,”हे सत्य आहे.

मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या काही आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे. मी बहुजन समाजातला आहे, निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची

माहिती असणारा आहे, हे मी मागच्या वेळीच मोदींना सांगितलं होतं. मात्र त्यांनी कोणीतरी कोविंद साहेब शोधून आणले आणि त्यांनी राष्ट्रपती केलं. बहुमत असल्यामुळं त्यांना ते जमलं

बिचुकले पुढे म्हणाले की, न्यायपालिका, केंद्रातले निर्णय यांची सगळी ताकद राष्ट्रपतीच्या दबावाखाली असते. राष्ट्रपतींनी देशासाठी बरंच काही करायचं असतं. पण ते करत नाहीत. म्हणूनच

आता मी देशातल्या आमदार खासदारांशी बोलतोय. सांगली, कोल्हापूर, पुण्यातल्या खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या

मिळाली तर माझा अर्ज १०० टक्के जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!