Friday, July 1, 2022

मोठी बातमी:महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता आणखी एक मोठी घडामोड व्हायची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात

राष्ट्रपती राजवट लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत

शिवसेनेचे 29 आमदार आहेत. हे आमदार आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात. या पत्रात शिवसेनेचं नाव घेतलं जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित असलेले 7 आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काल महाराष्ट्र विधान परिषद

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आणि काही आमदार

मुंबईहून सूरतच्या दिशेने रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 29 आमदार असतील, तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे

यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत.विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही

उमेदवार निवडून आले, सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी 26-26 मतं पडली. शिवसेनेची स्वत:ची संख्या 55 आणि सहकारी आमदारांची मिळून संख्या 64 आहे, म्हणजेच

शिवसेना आणि सहकारी पक्षांचे मिळून 12 आमदार फुटल्याचं काल निकाल लागल्यानंतरच स्पष्ट झालं.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!