Thursday, August 11, 2022

टेम्पो-मोटारसायकल अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील चिलेखनवाडी येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर झालेल्याटे म्पो-मोटारसायकल अपघातात रोहिणी गर्जे (वय १९ वर्षे) रा.वडुले या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवार दि.१९ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबद अधिक माहिती अशी की, रोहिणी गर्जे या आपल्या सासऱ्या सोबत कुकाणा येथे दवाखान्यात गेल्या होत्या.कुकाण्यातून मोटारसायकल वरून घरी जात असताना चिलेखनवाडी गावा जवळ नेवासा-शेवगाव रस्त्यावर सदर मोटारसायकलला पाठीमागून आलेल्या एम एच ०४-डी के – ८१९१ या ४०७ टेम्पोची मोटरसायकलला जोराची धडक लागून झालेल्या अपघातात टेम्पोची चाक डोक्यावरून गेल्याने वडूले येथील १९ वर्षीय गर्भवती महीला रोहिनी गणेश गर्जे ही जागीच ठार झाली असून तीचे सासरे रामदास हरिभाऊ गर्जे हे जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार नितीन भताने, तुकाराम खेडकर व पो. कॉ. अमोल साळवे हे घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर वडुले येथे रात्री उशिरा मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

याबाबद रामदास हरिभाऊ गर्जे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून टेम्पो चालक नामे परमेश्वर हाऊसराव आमले रा.आंभोरा, ता.आष्टी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!