Wednesday, August 17, 2022

पुढचे 3 दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. राज्याच्या काही भागात पावसाने उसंत दिल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले होते.

अनेक भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस चिंता वाढवणार विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे दिसून येते. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे.

ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाची शक्यता आहे.यंदा जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज असताना संपूर्ण महिना कोरडा गेला होता

त्यानंतर जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यभरात दमदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसाळामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या

काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!