स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हा उपक्रम जिल्ह्यात पूर्णपणे यशस्वी व्हावा, यासाठी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी या
उपक्रमाची जय्यत तयारी करून जनजागृती करावी, अशा सूचना केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण साेनी गुप्ता यांनी दिल्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत “हर घर तिरंगा” व “स्वराज्य महोत्सव” उपक्रम जिल्ह्यात राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, निवासी
उपजिल्हाधिकारी संदिप निचित, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे आदी उपस्थित होते. ११ ते १७ ऑगस्ट “स्वराज्य महोत्सव” आणि १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हा उपक्रम देशभर एकाचवेळी होणार आहे.
“बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील “हर घर तिरंगा” व “स्वराज्य महोत्सव” उपक्रमाच्या तयारी व नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.