नेवासा/प्रतिनिधी
तालुक्यातील जळके खुर्द येथील आंबेडकरनगर दलितवस्तीमध्ये तीनशे फुट बोअरवेल व सौरऊर्जा पंप प्लँन्ट नेवासा येथील मदर तेरेसा ट्रस्टचे चेअरमन फादर प्रकाश राऊत आणि लव लर्न अॅण्ड लिव्ह फाऊंडेशन जर्मनीच्या चेअरमन डॉ.पेत्रा कार्कविल यांच्यावतीने जळके खुर्द येथील दलितवस्तीतील नागरीकांच्या मुलभूत सोयींसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
या सौरऊर्जा प्लँन्टचे उद्घाटन फादर प्रकाश राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी सरपंच ॲड राजेंद्र पंडित,संजय शिंदे,रशिद पटेल,असिफ पठाण विठ्ठल परदेशी,सुनिल वाघमारे,पोपट गोरे,पाखरे,बापू आढागळे,साईनाथ ठाकर,हरिभाऊ आढागळे,दिनकर साळवे,आण्णा पंडित,भरत खरात,बहिरनाथ पंडित,नंदू पंडित,ग्रा.पं कर्मचारी बाबासाहेब एडके व प्रविण क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.