Thursday, August 11, 2022

बाळासाहेब थोरातांच्या विधानाने जिल्ह्यात जोरदार चर्चा म्हणाले …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणाऱ्यांचा ओढा दिसून येत आहे. नगरमध्ये मात्र, विविध पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस प्रवेश सुरू आहेत.

मनसेचे उपशहर प्रमुख अभिनय गायकवाड यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा धागा पकडून थोरात म्हणाले की, ‘अशीच पक्ष बांधणी

सुरू राहिली तर नगर शहरात काँग्रेसचा आमदार होईल.’ सध्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप आमदार आहेत. अशा परिस्थतीत थोरात यांचे हे वक्तव्य लक्षवेधक ठरत आहे.

नगर शहरातील विविध पक्षातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील मीरपूर येथील कार्यक्रमात थोरात यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. नगर शहर काँग्रेसचे

जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे माजी उपशहर प्रमुख अभिनय गायकवाड, माळीवाडा भागातील ज्योती उमेश साठे, दीपक जपकर, सावेडीतील सुजित क्षेत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ‘नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम संघटनात्मक बांधणी सुरू आहे. सातत्याने पक्षप्रवेश सुरू आहेत. काळे यांनी शहरात नव्या

दमाची चांगली टीम उभी केली आहे. शहरातील विविध घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमी धावून जात असतात. अशाच पद्धतीने समाजाचे काम त्यांनी सतत सुरु

ठेवले आणि संघटनात्मक बांधणी शहरात सातत्याने सुरू राहिली तर काळे नक्की काँग्रेसच्या माध्यमातून शहराचे आमदार होतील.किरण काळे म्हणाले, ‘नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर

विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीमध्ये सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे. आजही असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. संगमनेर मध्ये नगरपरिषद असून देखील आ. बाळासाहेब

थोरात यांच्या विकासात्मक व्हीजन मधून विकासाचे चांगले मॉडेल संगमनेरमध्ये राबविले गेले आहे. नगर शहरामध्ये देखील संगमनेरच्या धर्तीवर विकासाचे मॉडेल राबवण्याची गरज आहे.

आगामी काळात महानगरपालिकेत सत्ता मिळवत शहर काँग्रेस विकासाच्या संगमनेर मॉडेलची अंमलबजावणी नगर शहरामध्ये निश्चितपणे करेल असे काळे म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!