Wednesday, August 17, 2022

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई/प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या यिन ‘कॉनक्लेव २०२२’ कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले यांच्या नावावर मतांच्या माध्यमातुन शिक्कमोर्तब केले.

यिन,समिधा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, स्टुडंट्स ऑलिम्पिक अससोसिएशन अशा विविध संघटनेचे राज्यभरातील त्यांचे संघटनात्मक व सामाजिक कार्य आणि युवक वर्गातील संपर्क याचा विचार करून मतदानाच्या माध्यमातून ही निवड झाली आहे. दोन महिने चाललेल्या या निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर यश मिळवत अखेर दिव्या यांनी या समितीवर त्यांचे स्थान मिळवले. ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि सामाजिक कामाचा अहवाल, अस या निवडीचे स्वरूप होते. भोसले यांचे सामाजिक काम, युवकांचा थेट संपर्क आणि दांडगा अनुभव यामुळे त्यांची नियुक्ती झाली आहे. यिनच्या माध्यमातून दिव्या गेल्या 8 वर्षांपासून संबंध महाराष्ट्रभर कार्यरत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो.समिधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रभर नव्हे तर 5 राज्यांमध्ये शाश्वत विकासाचे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी अभिजीत पवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे, सिनेअभिनेते सौरभ गोखले, महेंद्र सोनवणे, सकाळचे संपादक संदीप काळे व यिन चे व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार आदी दिग्गज मान्यवरांनी यावेळी या नेतृत्व करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन केले.

‘यिन’च्या माध्यमातुन देशभरातील युवकांना जोडणार- दिव्या भोसले

येत्या काळात यिन केंद्रीय कॅबिनेट समितीच्या माध्यमातून ‘यिन’चे जाळे भारतभर पसरविण्याचे माझा मानस आहे. या माध्यमातून तळागाळातील प्रश्न मी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. युवकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या मताची मी कायम ऋणी राहीन,ही प्रतिक्रिया देऊन दिव्या भोसले यांनी सर्व मतदारांनविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!