माय महाराष्ट्र न्यूज:आज छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर औरंगाबाद येथे मराठा आंदोलनातील पहिले शहिद काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतीं यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात येणार आहे.
काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. काकासाहेबांच्या सोबतच ज्यांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करतो. सर्वांना माझी विनंती आहे की, ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं त्यांना सरकाराने शब्द दिला होता की या सर्वांना नोकरी देऊ.
मात्र त्यांच्या घरातील व्यक्तींना अद्यापही नोकरी देण्यात आलेली नाहीये. बलिदान दिलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ शासकीय नोकरी द्या.जे खातं बंद पडत चाललं आहे अशा खात्यात नोकरी देऊ नये. तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर दोन गोष्टी त्वरित करा एक म्हणजे कुटुंबातील एकाला
तात्काळ नोकरी द्या आणि दुसरं म्हणजे बंद पडणाऱ्या कुठल्याही खात्यात नोकरी देऊ नये ही शासनाला विनंती आहे.कायगावमध्ये जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे सुद्धा सरकारने मागे घ्यावेत.मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. माझा लढा आजचा नाहीये. माझे कर्तव्य आहे त्यासाठी मी बाहेर पडलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही. माझा लढा स्वतंत्र आहे.
माझी कोणासोबतही तुलना करू नका ही विनंती आहे. मी कुणालाही एकत्र येण्यासाठी आवाहन करणार नाही. मी समाजाला चुकीच्या दिशेने जाऊ देणार नाही. समाजाला आपण का वेठीस धरायचं? समाजाने आपली भूमिका मांडली आहे.