Wednesday, August 17, 2022

शेतकरी बांधवांनो पेरणी करताय? जरा थांबा, कृषी विभागाने केले हे आवाहन वाचा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू होते पेरणीची. अनेक ठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामाला हात लावत आहेत. मात्र, याच संदर्भात आता कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक आवाहन केलं आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते.

त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मार्फत करण्यात येत आहे.आठ दिवसंपासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग आणि मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.

विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी आणि वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!