Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यातील या आमदारला देव माणूस मानून केले पूजन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते इच्छाशक्तीच्या बळावर भाळवणी येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरु केले. सुमारे ८२०० रुग्णांना व्यवस्थित बरे करून घरी पाठवले असून एकही रुग्ण आजपर्यंत दगावला नाही.

संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनीमहाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमात पारनेरचे आमदार निलेश लंके बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनीमहाराज जयंती आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. पुष्पवृष्टी करत लंके यांचे स्वागत करण्यात आले.

रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तृप्ती कान्होरे या तरुणीने रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला.लंके म्हणाले, आपण नैसर्गिक पद्धतीने काही कोरोना रुग्ण हे बरे केले असून शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला दिल्ली येथील विश्वरूप रॉय चौधरी यांनीही भेट दिली. देशात माझ्या इतका कोरोना रुग्णांशी संबंध कुणाचा आला नसेल.

अनेक कोरोना रुग्ण भीतीपोटी मृत्युमुखी पडले. आम्ही रुग्णांना आधार देऊन त्यांची भीती घालविण्याचे काम केले. रुग्णांच्या मंनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात, तर सकाळी योगा देखील घेतला जातो.
देवमाणूस मानून पूजन आमदारांचं जंगी स्वागत आपण याआधी ही पाहिलं असेल, पण हे स्वागत आहे कार्यतत्पर आमदारातील देवमाणसाचं,

आंबी खालसा येथील तरुणांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना देवमाणूस मानून त्यांचा सत्कार न करता जल व पंचामृताने पाद्यपूजन केले. पुष्पवृष्टी करून विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट दिली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!