माय महाराष्ट्र न्यूज:एखाद्याला ताप आला, कुणी खोकत असेल तर त्याला कोरोना तर झाला नाही अशी भीती आपल्या मनात निर्माण होते. काही कोरोना रुग्णांमध्ये लक्षणंही दिसत नाहीत.
सध्या कोरोना रुग्णांचं निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट, अँटिजेन टेस्ट केली जाते. पण आता असा अलार्म तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना रुग्ण असेल तर तुम्हाला तो धोक्याची घंटा देणार आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माउंटेड कोविड अलार्म तयार केला आहे.
जो रुममधील कोरोनाबाधित व्यक्तीबद्दल 15 मिनिटांत माहिती देईल, असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे.कोरोनाबाधितांबद्दल माहिती देणारं हे उपकरण येत्या काळात विमानातील केबिन, शाळा, केअर सेंटर आणि घर तसंच कार्यालयांमध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार स्मोक अलार्म एवढा आहे.
आज तकने द संडे टाईम्सच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसारस लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निकाल आशादायी आहेत. डिव्हाइसमधील परिणामाची अचूकता पातळी 98-100 टक्के पर्यंत प्रभावी आहेेेे.
असं संशोधकांनी टेस्टिंगनंतर सांगितलं. ही चाचणी आरटीपीसीर आणि अँटिजेन टेस्टच्या तुलनेतही जास्त प्रभावीपणे कोरोनाबाधितांची माहिती देत आहे.