Thursday, August 11, 2022

उद्योगभारतीच्या महाकृषियात्रा अभ्यासदौरा मॉडेलची स्टार्टअप इंडियासाठी भारत सरकार कडून निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषि पदवीधर संघटनेच्या उद्योगभारती विभागा मार्फत सातत्याने इस्राईल,सिक्कीम सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाते.यात शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण व पर्यटनाचा आनंद या संकल्पनेवर आधारित सेवा दिली जाते.

दर वर्षी शेकडो शेतकरी या अभ्यास दौऱ्याचा लाभ घेत असतात.कृषिभूषण महेश कडूस पाटील यांनी कृषि पदवीधर संघटने अंतर्गत हा विभाग सुरू केला आहे.याला आता सात वर्षे पूर्ण होत असून राज्यात अनेक शेतकऱ्यांनी महाकृषि यात्रा मधे नोंदणी करुन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व अभ्यास इस्राईल, थायलंड,दुबई

सारख्या देशा मध्ये पूर्ण केला आहे नुसतेच पर्यटन किंवा प्रशिक्षण च नाही तर आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शने सुद्धा आम्ही सेवा मध्ये समाविष्ट आहे अशी माहिती संस्थेचे मुख्य समन्वयक प्रतिक यांनी दिली.स्टार्टअप इंडिया भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेत उद्योगभारतीच्या आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे (विशेषतः इस्राईल)

या बिझिनेस मॉडेल ची दखल राष्ट्रीय कृषि विकास योजना व स्टार्ट अप इंडिया ने घेतली असुन, देश पातळीवर अडीच हजार व्यवसायिक संस्था या स्पर्धेत होत्या त्यातून वीस उत्कृष्ट व्यवसायिक संकल्पना सरकारने निवडल्या आहेत. यात कृषि पदवीधर संघटना चा अंगीभूत उपक्रम उद्योगभारती व महाकृषि यात्रा या ब्रॅण्ड चा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही दशकभर प्रशिक्षण व पर्यटन या क्षेत्रात संस्थेचे काम वाढवले त्याचेच हे फळ असुन पुढे देखील कोरोना च्या पार्श्वभूमीवर काही आव्हाने असली तरी न थकता शेतकरी बांधवांना प्रशिक्षण पर्यटन सेवा देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्षा श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!