Thursday, August 11, 2022

खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ;कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट आणि खोटे असल्याचं आता उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत समोर आलं आहे.

याबाबत 1,600 पानांचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. कुंभ मेळ्याच्या काळात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल 1 लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.

यातीलच एक उदाहरण म्हणजे, एकच फोन नंबर तब्बल 50 लोकांच्या नावापुढे रजिस्टर करण्यात आला आहे. दुसरी बाब म्हणजे या सर्वांसाठी एकच अँटीजन कीट वापरलं गेलं असून ( याचा वापर केवळ एकदाच करता येतो) यातच 700 जणांची चाचणी केली गेली आहे.

यात देण्यात आलेले पत्ते आणि नावंही पूर्णपणे काल्पनिक असल्याचं आढळलं आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हरिद्वारमधील घर क्रमांक 5 मधील एकाच घरातून 530 जणांचे सॅम्पल घेतल्याची यात नोंद आहे. एकाच घरात ५०० लोक राहाणं शक्य आहे का? असा प्रश्नही यानंतर उपस्थित झाला आहे. यात देण्यात आलेले इतर पत्तेही विचित्र आहेत. ज्यांचा कुंभ मेळ्याशी काहीही संबंध नाही.

अधिकाऱ्यानं याबाबत माहिती देत म्हटलं, की अनेक फोन नंबर फेक आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि 18 इतर लोकेशनवरील लोकांनी एकसारखेच नंबर शेअर केले आहेत. आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अहवाल

हरिद्वाराच्या डीएमकडे पाठविण्यात आला आहे. यात बरीच अनियमितता सापडली आहेत. 15 दिवसात डीएमकडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर आम्ही कारवाई करू, असंही नेगी म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!