Wednesday, August 17, 2022

पुन्हा नगर जिल्हा हदरला:ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार संपुर्ण तालुक्यात खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर काल रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या वर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती मिळालेली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रोडने रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले असता मोटारसायकलवरून आलेल्या इसमांनी गावठी कट्टयातून संकेत याच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले.

त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे .
या घटनेने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान नेवासा तालुक्यातील चांदयातील घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच बऱ्हाणपूर येथे झालेल्या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे, शिंगणापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल तातडीने घटनास्थळी हजर झाले असून पुढील तपास चालु आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!