Thursday, August 11, 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी अलर्ट, उद्या काही तासांसाठी काम ठप्प, हे आहे कारण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भारतातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची सुचना आहे.

17 जूनला बँकेची ऑनलाईन सुविधा बंद राहणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यात नेहमी तप्तर असते, ज्यामुळे ग्राहकांना घर बसल्या किंवा बँकेत न जाता डिजिटल सुविधेचाही लाभ घेता येतो. परंतु आता बँकेने ट्विट करुन ग्राहकांना माहिती दिली आहे की,

17 जून 2021 ला 00.30 ते 02.30 वाजेपर्यंत बँकेचे मेंटेनेंसचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे दोन तासांसाठी इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप , योनो लाईट आणि यूपीआयची सुविधा देखील बंद राहणार आहेत.एसबीआय योनो हे एक इंटिग्रेटेड डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या माध्यमातून ग्राहक अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

यामुळे ग्राहकांना आर्थिक सुविधांसह विमानसेवा, रेल्वे, बस आणि टॅक्सी बुकिंग, ऑनलाईन शॉपिंग किंवा मेडिकल बिल पेमेंटवर सुविधा मिळते. Android आणि IOS दोन्ही यूजर्स याचा सोप्या पद्धतीने वापर करु शकतात.

देशभरात एसबीआय बँकेच्या 22 हजाराहून अधिक शाखा आहेत. तसेच 58 हजाराहून अधिक एटीएम आणि सीडीएमचे नेटवर्क आहे. बँकेचे 8.5 कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि 1.9 कोटी ग्राहक मोबाईल बँकिंगचा वापर करतात. याशिवाय बँकेचे इंटीग्रेटेड डिजिटल अॅण्ड लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म योनोला ग्राहकांनी अधिक पसंती दर्शवली आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!