Thursday, August 11, 2022

नगर ब्रेकींग:बँक बोगस कर्जप्रकरण याेगेश मालपाणीला अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर शहर बॅंकेच्या बाेगस कर्जप्रकरणात याेगेश मालपाणी याला पाेलिसांनी आज सकाळी साडेनऊ वाजता चाैकशीसाठी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी या माहितीला दुजाेरा दिला.

मालपाणी याच्याकडे संपूर्ण चाैकशी केल्यानंतर त्याला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी केली आहे. शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी गुन्ह्याचा तपास अद्याप सुरूच आहे.

तीन गुन्हे :
डाॅ. नीलेश शेळके संचालित ‘एम्स’ हाॅस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

कर्जासाठी बनावट कागदपत्रेे:
राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे हे तिघे फिर्यादी आहेत. हॉस्पिटलमध्ये भागीदार असल्याने या तीनही डॉक्टरांची बनावट कागदपत्रे, बनावट सह्या तयार करून शहर सहकारी बँकेकडून प्रत्येक डॉक्टरच्या नावावर परस्पर बोगस कर्ज मंजूर करून घेण्यात आले.

दोषारोपपत्र दाखल :
‘एम्स’ हाॅस्पिटलमधील मशिनरींचा पुरवठा याेगेश मालपाणी याच्यामार्फत झाला हाेता, हे तपासात पुढे आले आहे. डॉ. नीलेश विश्‍वास शेळके याच्याविराेधात दाखल तीन गुन्ह्यांमध्ये स्वतंत्र दोषारोपपत्र जूनच्या पहिल्या तारखेला न्यायालयात दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!