Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस;लस न घेताच ऑनलाइन…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकाला लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील आरोग्य केंद्रात घडला.भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी असलेले आदित्य अण्णासाहेब नजन यांनी ता. 3 जुलै रोजी कोरोना लसीकरणाच्या

पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार ते भातकुडगाव येथील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी 3 जुलै रोजी तेथे 10.30 वाजता गेले होते. त्यावेळी तेथे प्रथम 45 वयापुढील नागरीकांना लस देण्यास सुरवात केली व 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना नंतर लस देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र गर्दी वाढल्याने त्यांना लस मिळाली नाही. त्यानंतर ता. 7 जुलै रोजी

भातकुडगाव आरोग्य केंद्राअंतर्गत सामनगाव उपकेंद्रात 200 डोस उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्याने नजन तेथे लस घेण्यासाठी गेले. मात्र तेथे स्थानिक नागरिकांची संख्या जास्त असल्याने तेथेही त्यांना लस मिळाली नाही.वैद्यकीय अधिकारींकडून उडवाउडवीची उत्तरेमात्र त्यानंतर त्यांना ता. 9 जुलै रोजी लस घेतल्याबाबतचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला.

त्यावर दिलेल्या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर त्यांना कोव्हिशिल्डचा पहिलाडोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. या सर्व प्रकारामुळे ते चक्रावून गेले. व लस न घेताच प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना, यापुढे लस मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ही बाब त्यांनी संबंधित आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!