Sunday, October 24, 2021

मार्क वाढवून देतो म्हणून विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला 12वी मध्ये मार्क वाढवून देतो असं सांगत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. हा शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता.

तसंच 12वी मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.मुलीने केलेल्या गंभीर आरोपानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तसंच त्याच्या तोंडाला काळंही फासलं. त्यानंतर त्या शिक्षकाला फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शैक्षणिक वारसा लाभलेल्या आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात हा प्रकार घडल्यामुळे सर्व स्तरातून त्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.विद्यार्थिनीच्या पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आज या विकृत शिक्षकाची तोंडाला काळं फासून धिंड काढली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पवार असे या शिक्षकाचे नाव आहे.पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो,

असं सांगून अभिजित पवार हा सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र, नकार देऊन देखील प्रकार सुरूच राहिल्यामुळे अखेर सदर विद्यार्थिनीने शिक्षक अभिजित पवारने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला आणि आपल्या पालकांना, तसेच नातेवाईकांना ऐकवला.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!