Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील त्या प्रसिद्ध हॉटेलवर बाप-लेक चालवत होते कुंटणखाना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:नगर-दौंड रोडवरील खंडाळा परिसरातील हॉटेल राजयोगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका करुन दोनजणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना खंडाळा गावाच्या शिवारात हॉटेल राजयोगमध्ये मालक अनिल माणिकराव कर्डिले (वय 52) व अक्षय अनिल कर्डिले (वय 25. दोघे रा. खंडाळा ता. जि. अहमदनगर) हे संगनमताने आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये परप्रांतीय मुलीना देहविक्री करण्यासाठी बोलावून

कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळून आल्या. त्यांना स्नेहालय येथे पाठवले आहे. दरम्यान, हॉटेल मालक व मुलगा यांना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

500 रुपयांच्या 14 नोटा व 100 रुपयांच्या 15 नोटा असे एकूण 8 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहेत. हॉटेल मालक व मुलगा यांना अटक करून नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!