Monday, October 25, 2021

धक्कादायक:पुन्हा नगर जिल्ह्यातील एका पुरुषावर त्याच महिलेचा दुसरा हनीट्रॅप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका व्यक्तीने संगमनेरच्या महिलेच्या हनीट्रॅपचा बुरखा फाडल्यानंतर आणखी एक तक्रारदार आता पुन्हा पुढे आला आहे. त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात येऊन सांगितले की, याच महिलेने दि. 6 जून 2021 रोजी माझ्यावर असाच ट्रॅप लावला होता.

फेसबुकवर मैत्री करुन मला चहा पिण्यासाठी संगमनेरात बोलविले आणि दार बंद करुन माझा मोबाईल हिसकून घेतला. तसेच खिशातील पैसे देखील काढून घेतले प्रचंड मारहाण केली होती. दहा हजार रुपये दे नाहीतर तू आमची छेडछाड केली असे म्हणून तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करु. मात्र, कर नाही त्याला डर कशाला? असे म्हणत या निर्भिड पुरुषाने थेट संगमनेर

पोलीस ठाणे गाठले आणि तीन महिला व दोन पुरुष यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दुर्दैवाने तक्रारदाराचे म्हणणे आहे की, पोलिसांनी मला सहकार्य केले नाही. माझी तक्रार देखील गहाळ झाली. त्यामुळे, मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो. काल सार्वभौमची बातमी वाचली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासमोर आपली कैफीयत मांडली.

घुगे यांना हा प्रकार वरिष्ठांना कळविला आहे. आता संगमनेर पोलिसांनी ठरविले तर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात एका उच्च घराण्यातील व प्रतिष्ठीत व्यक्तीचे सोशल मीडियावर फेसबुक आकाऊन्ट होते. त्यामुळे, त्यांना याच गुन्ह्यातील एका महिलेची फे्रन्ड रिक्वेस्ट आली होती.

मात्र, हेतूपुर्वक पाठविलेली ही रिक्वेस्ट त्यांच्या लक्षात आली नाही. बोलबोल करता यांच्यात फेसबुकला चॅटींग सुरू झाली. काही काळानंतर या महिलेने या व्यक्तीस संगमनेर येथील गणेशनगर परिसरात भेटण्यासाठी बोलविले. काही नाही, थोडसं काम आहे, मदत हवी आहे त्यामुळे चहापाणी घेऊ आणि चर्चा करु अशी तीने विनंती केल्याचे संबंधित व्यक्तीच्या अर्जात म्हटले आहे.

मदत तथा चर्चा करण्याच्या हेतूने त्यांनी संगमनेर गाठले. तेथे एका पेट्रोलपंपावर यांची भेट झाल्यानंतर ते गणेशनगर येथे गेले. त्या घरात एकही पुरुष नसल्याने या व्यक्तीस शंका आली. त्यामुळे ते सावध होते. याच वेळी एकाने महिलेने घराचे दार बंद केले आणि संबंधित व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तुमचा मोबाईल किती सुंदर आहे असे म्हणून तो स्वत:कडे ठेवला आणि धमकी देत त्यांच्या खिशात जी काही रक्कम होती. ती त्यांनी काढून घेतली.

यावेळी या व्यक्तीने त्यांच्या मोबाईलची मागणी केली असात महिलांना त्यांना घराबाहेर काढून देत त्या दोघी कसारा दुमालाच्या पुलाजवळ गेल्या. त्यांच्याकडे यांचा मोबाईल असल्यामुळे, हे गृहस्त देखील त्यांच्या पाठोपाठ गेले. कारण, त्या मोबाईलमध्ये मुलाची काही कागदपत्रे आणि कौटुंबिक फोटो होते. या महिला या थराला जाऊ शकतात तर त्या मोबाईल व डाटा

यांचा गैरवापर देखील करु शकतात याची त्यांना भिती होती. त्यामुळे ते देखील अकाले-बायपास नजीन कसारा दुमालाच्या पुलाजवळ आले. त्यांनी संबंधित महिलांना विनम्रपणे मोबाईलची मागणी केली. मात्र, नियोजनपुर्वक ठरल्यानुसार काही झालेच नव्हते तर त्या मोबाईल देणार कशा? त्यामुळे, या ठिकाणी महिला व या व्यक्तींमध्ये खडाजंगी झाली.

हा व्यक्ती स्वत:वर ठाम असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची चुक केली नाही. मात्र, संबंधित महिलांनी त्यांना सांगितले की, जर तुम्ही 10 हजार दिले नाही तर तुम्ही आमची छेडछाड केली असे म्हणून येथेच आरडाओरड करु आणि पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करु. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वत: पोलीस ठाण्यात चला असे म्हणत त्यांना नमविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांनी लागेच दोन व्यक्तींना फोन करुन बोलावून घेतले. ते तेथे एका अलिशान गाडीत आले असता त्यांनी देखील यांना मारहाण करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोक तेथे जमा झाले असता या व्यक्तीने सर्व घडलेला प्रकार लोकांसामोर कथन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, आपले पितळ उघडे होत आहे. असे लक्षात येताच त्यांनी त्या अलिशान गाडीतून पलायन केले.

हा प्रकार दि. 6 जून 2021 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराचा आहे. बहुतांशी लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर एक मदतीच्या हेतूने गेलेल्या महिलांनी अशा प्रकारे कृत्य करावे हे संबंधित प्रांजळ मनाच्या व्यक्तीस फार वाईट वाटले. ते प्रचड घाबरलेले असल्याने त्यांना काही वेळ काहीच सुचत नव्हते. मदत करण्याचा हेतू अंगलट आल्यामुळे त्यांना पश्चाताप देखील आला होता.

त्यामुळे, त्यांनी त्या दिवशी अकोल्याला येण्यापुर्वी थेट संगमनेेर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांच्या समोर मांडला. मात्र, त्यावेळी त्यांना सहकार्य झाले नाही. त्यांच्या घरात कोरोनाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे, त्यांनी शांत राहणे पसंत केले. मात्र, आजही तो मोबाईल, त्यांची रक्कम आणि त्यांच्यासोबत घडलेला प्रकार ते विसरले नाही. अकोले पोलीस ठाण्यातील दाखल झालेला प्रकार वाचताक्षणी त्यानी

अधिकार्‍यांची भेट घेऊन आपल्या इतिहास जमा होणार्‍या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आता ही घटना संगमनेर हाद्दीत घडल्यामुळे पुढे काय होते हे काही दिवसात समोर येईल.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!