Wednesday, October 27, 2021

सहायक अभियंत्यांना धक्काबुक्की 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:शहराच्या गंजबाजार येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता स्वप्नील संजयराव उल्हे (वय 32 रा. वसंत टेकडी, मुळ रा. चांदुरबाजार जि. अमरावती) यांना वीज बिल भरण्याच्या कारणातून 10 ते 15 लोकांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

बुधवारी सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान कार्यालयामध्ये ही घटना घडली.या प्रकरणी अभियंता उल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुल्तान दुल्हेखान शेख (रा. जुनाबाजार, नगर) याच्यासह 10 ते 15 अनोळखी व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिसांनी शेख याला बुधवारी रात्रीच अटक केली. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. महावितरण विभागाच्या गंजबाजार कार्यालयाअंतर्गत येणार्‍या जुना बाजार परिसरातील सुल्तान शेख याचे वीज बिल थकले होते. बुधवारी महावितरणचे अधिकारी बिल वसुली करण्यासाठी शेख याच्या घरी गेले होते.

त्याने बिल भरले नाही. उलट सायंकाळी 10 ते 15 इसमांना घेऊन तो कार्यालयात आला. यावेळी तेथे असलेले सहायक अभियंता उल्हे यांच्याशी हुज्जेत घातली. हा जमाव उल्हे यांच्या अंगावर धावून गेला, त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. कार्यालयात गोंधळ घातला. याबाबत उल्हे यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या पथकाने शेख याला रात्रीच ताब्यात घेतले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!