Wednesday, October 27, 2021

नगर जिल्हा हनीट्रॅप:त्या महिलेनं अंबडच्या अजून एक जणाला ओढले जाळ्यात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील काही बड्या व्यक्तींना  प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणारी महिलांची टोळी संगमनेरात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या टोळीतील काही महिलांनी अकोले तालुक्यातील अंबड येथील एका इसमास ब्लॅकमेल करून त्याच्याकडील मोबाईल व एक हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

याबाबत सदर इसमाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोले तालुक्यातील अंबड येथील एका व्यक्तीवर दीड महिन्यांपूर्वी हा प्रसंग उद्भवला होता. फेसबुकच्या माध्यमातून त्याची संगमनेर येथील एका तरुणीशी ओळख झाली. सदर महिलेने त्याच्यासोबत ओळख वाढवून नंतर संगमनेर येथे भेटीसाठी बोलावले.

शहरातील शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची भेट झाली. या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर सदर महिलेने सदर इसमास गणेश नगर येथे तिच्या मावशीच्या घरी नेले.या घरांमध्ये तीन महिला उपस्थित होत्या. या महिलांनी त्या व्यक्तीला चहा घेण्याचा आग्रह केला. या घरात एकही पुरुष नसल्याने सदर इसमास शंका आली. यातील एका महिलेने बोलण्याच्या नादात त्याच्याकडील मोबाईल घेतला.

या खोलीत काहीतरी वेगळाच प्रकार चालत असल्याची शंका आल्याने सदर इसमाने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी एका महिलेने दरवाजा बंद करून घेतला. तिने धमकी देऊन त्याच्याकडील एक हजार रुपये काढून घेतले. यानंतर दोन महिला त्यांच्या स्कुटीवर बसून निघून गेल्या.सदर इसमाने त्यांचा पाठलाग करून अकोले बायपास येथे त्यांना अडविले. आपला मोबाईल परत द्या अशी त्यांनी मागणी केली.

तू आम्हाला दहा हजार रुपये दे नाहीतर तू आमची छेड काढली म्हणून आरडाओरड करू अशी धमकी या महिलेने दिली. यावेळी त्यांनी दोघा पुरुषांनाही बोलावले. हे सर्वजण नंतर वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. याबाबत सदर इसमाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. सदर महिलेच्या ताब्यातून आपला मोबाईल त्वरित द्यावा. मोबाईल मध्ये कुटुंबाचे फोटो असल्याने

सदर महिला त्याचा गैरवापर करतील अशी शंका त्याने या तक्रार अर्जात केली आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.सदर इसमाने याबाबत तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी सबंधित महिलांना विरोधात भादंवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!