Monday, October 25, 2021

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून नवीन ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी हे सुरू केले आहे. या डिजिटल प्लॅटफार्मवर शेतकऱ्यांना पीक व इतर बाबींची माहिती दिली जाईल.या प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने आता शेतकऱ्यांना वेळेत पूर्ण माहिती मिळू शकेल, तीदेखील त्यांच्याच भाषेत तसेच

या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी आपले पीक आणि भाजीपाला योग्यरित्या बाजारात विकू शकतील. दरम्यान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथी या डिजिटल प्लॅटफार्मचे लाँचिंग केले.

यावेळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी थेट वैज्ञानिकांकडून शेती व त्यासंबंधित क्षेत्रातील वैयक्तिक सल्ला घेऊ शकतात. शेतकर्‍यांचे धान्य त्यांच्या शेतात, गोदामे, बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी पोचविण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपांवर संशोधन केले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कमी खर्चात विकून शकतील, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना Kisan Sarathi चा काय फायदा?

डिजिटल प्लॅटफार्म Kisan Sarathi च्या सहाय्याने शेतकऱ्यांना चांगले पीक, योग्य प्रमाणात उत्पादन आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींची माहिती मिळू शकेल. शेतकरी पिकाशी संबंधित कोणतीही माहिती थेट वैज्ञानिकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेऊ शकतात. तसेच, शेतकरी हे शेतीच्या नवीन पद्धती शिकू शकतात‌.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!